RCB VS RR | Highlights|IPL 2023 Points Table |Match 32| RCB ने RR ला 7 रन्सनी हरवले
RCB VS RR | Highlights|IPL 2023 Points Table |Match 32| RCB ने RR ला 7 रन्सनी हरवले

RCB VS RR

RCB VS RR आज एन चिनास्वामी स्टेडियम बेंगलोर येथे झालेल्या rcb vs rr सामन्यात,राजस्थान रॉयल्स ने toss जिंकून प्रथम फिल्डींग करण्याचा निर्णय घेतला, प्रथम बॅटिंग करण्यासाठी उतरलेल्या रॉयल चॅलेंजर बेंगलोर संघाकडून ओपनिंग ला डूप्लेसीस आणि विराट कोहली खेळायला आले, खेळायला आल्यानंतर रॉयल चॅलेंजर बेंगलोर संघाची सुरुवात निराशाजनक झाली, रॉयल चॅलेंजर बेंगलोर ची पहिल्या ओव्हर च्या पहिल्या बॉल वर विकेट पडली.
विराट कोहली पहिल्याच बॉलवर तंबूत परतला
RCB VS RR रॉयल चॅलेंजर बेंगलोर कडून सलामीला आलेला कर्णधार विराट कोहली हा ट्रेंट बोल्ट च्या पहिल्याच बॉल वर LBW आउट झाला आणि तंबूत माघारी परतला त्यामुळे रॉयल चॅलेंजर बेंगलोर ची सुरुवात अतिशय निराशाजनक झाली रॉयल चॅलेंजर बेंगलोर चा स्कोर शून्य रन्सवर एक आऊट असा होता.
त्यांनतर आलेला शहजाद अहमद पण स्वस्तात आउट झाला
RCB VS RR विरार कोहली आउट झाल्यावर रॉयल चॅलेंजर बेंगलोर कडून शहजाद अहमद खेळायला आला, मात्र तोपण काही कमाल न करता तंबूत परतला त्याने त्याने 4 बॉल्स मध्ये 2 रन्स केले,त्याला ट्रेंट बोल्ट ने तिसऱ्या ओव्हर च्या पहिल्या बॉलवर यशस्वी जयस्वाल कडे कॅच देऊन आउट केले,तेव्हा रॉयल चॅलेंजर बेंगलोर चा स्कोर 12 रन्सवर 2 विकेट असा होता.
डूप्लेसिस आणि मॅक्सवेल ने केली शतकीय रन्सची भागीदारि
RCB VS RR रॉयल चॅलेंजर बेंगलोर चे 12 रन्सवर 2 विकेट पडल्यावर खेळपट्टी वर डूप्लेसीस आणि ग्लेन मॅक्सवेल खेळत होते, त्यांना खेळत असतांना 100 रन्सच्या वरती भागीदारि करत रॉयल चॅलेंजर बेंगलोर चा स्कोर 100 च्या वर नेला आणि 139 वर रॉयल चॅलेंजर बेंगलोर ची तिसरी विकेट पडली.दोघांची अर्धशतकीय पारी पुर्ण झालेली होती.
डूप्लेसिस 62 रन्स करून आउट झाला
![]() |
| RCB VS RR |
RCB VS RR ग्लेन मॅक्सवेल सोबत 100 रन्स च्यावरती भागीदारि करून डूप्लेसिस 39 बॉल्समध्ये 8 चौकार आणि 2 षटकार च्या मदतीने 62 रन्स करून आउट झाला,त्याला यशस्वी जयसवाल ने रनआउट केले, तेव्हा रॉयल चॅलेंजर बेंगलोर चा स्कोर 13.2 ओव्हर्स मध्ये 139 रन्सवर 3 विकेट असा झाला होता, डूप्लेसिस च्या जागी महिपाल लोमरार खेळायला आलेला होता.
RCB VS RR रॉयल चॅलेंजर बेंगलोर चे स्कोर 15 ओव्हर्स मध्ये 156 रन्स असताना रॉयल चॅलेंजर बेंगलोर ची चौथी विकेट पडली ती म्हणजे ग्लेन मॅक्सवेल च्या रूपाने, ग्लेन मॅक्सवेल ने शानदार असे 44 बॉल्स मध्ये 6 चौकार आणि 4 षटकार च्या मदतीने 77 रन्स केले, त्याला रवीचंद्रन अश्विन ने जेसन होल्डर कडे कॅच देऊन आउट केले.तेव्हा रॉयल चॅलेंजर बेंगलोर चा स्कोर 15 ओव्हर्स मध्ये 156 रन्सवर 4 विकेट्स असा होता.
RCB VS RR 15 ओव्हर्स मध्ये रॉयल चॅलेंजर बेंगलोर चे 156 रन्सवर 4 विकेट पडलेले असतांना, शेवटच्या 5 ओव्हर्स साठी खेळपट्टी वर दिनेश कार्तिक आणि महिपाल लोमरार खेळत होते, त्यांनतर अचानक यजुर्वेद चहलच्या बॉलिंगवर देवदत्त पदिक्कल ने कॅच घेऊन, सतराव्या ओव्हर्स च्या तिसऱ्या बॉलवर रॉयल चॅलेंजर बेंगलोर ची पाचवी विकेट पडली, महिपाल लोमरार 6 बॉल्स मध्ये 1 चौकार च्या मदतीने 8 रन्स करून तंबूत परतला, तेव्हा रॉयल चॅलेंजर बेंगलोर चा स्कोर 163 वर 5 आउट असा झाला होता.
RCB VS RR रॉयल चॅलेंजर बेंगलोर चे 163 वर 5 आउट असा स्कोर असताना महिपाल लोमरार च्या जागी खेळायला आलेला सुयश प्रभुदेसाई खाते ना उघडता शून्यावर तंबूत परतला,त्याला यशस्वी जयस्वाल ने रनआउट केले, तेव्हा रॉयल चॅलेंजर चा स्कोर 16.5 ओव्हर्स मध्ये 163 रन्सवर 6 विकेट्स असा झाला होता.
RCB VS RR रॉयल चॅलेंजर बेंगलोर चा स्कोर 163 वर 6 विकेट्स असतांना, दिनेश कार्तिक वर दबाव जाणवत होता, तो 9 बॉल्स मध्ये 1 चौकार च्या मदतीने 9 रन्सवर खेळत होता,त्यानंतर तिकडे वणींडू हसरंगा 5 बॉल्स मध्ये 4 रन्सवर खेळत होता, तेव्हा रॉयल चॅलेंजर बेंगलोर चा स्कोर 18.3 ओव्हर्स मध्ये 174 वर 6 आउट असा होता.
RCB VS RR शेवटच्या विसाव्या ओव्हर मध्ये रॉयल चॅलेंजर बेंगलोर च्या पहिल्या बॉलवर विकेट्स गेली,वणींडू हसरंगा 7 बॉल्स मधे 6 रन्स करून रन आउट झाला त्याला संजू सॅमसन ने रनआउट केले, त्यानंतर दिनेश कार्तिक ने 1 चौकार मारला आणि तिसऱ्या बॉलवर तो पण तंबूत परतला, त्याने 16 बॉल्स मध्ये 2 चौकार च्या मदतीने 16 रन्स केले,त्याला संदीप शर्मा ने जोस बटलर कडे कॅच देऊन आउट केले,त्यापाठोपाठ खेळायला आलेला व्यषक विजय कुमार पण शून्यावर तंबूत परतला, शेवटी आलेल्या मोहम्मद सिराज ने पाचव्या बॉल वर 1 रन काढला आणि strike वर असलेला डेव्हिड विले ने चौकार मारून शेवट केला, मोहम्मद सिराज ने 1 रन तर डेव्हिड विले ने 2 बॉल मध्ये 4 रन्स केले, ते दोघे नॉट आउट राहिले, तेव्हा रॉयल चॅलेंजर बेंगलोर चा स्कोर 20 ओव्हर्स मध्ये 189 रन्स वर 9 विकेट्स असा झाला.
RCB VS RR रॉयल चॅलेंजर बेंगलोर ने डूप्लेसिस आणि ग्लेन मॅक्सवेल यांच्या शानदार खेळलेल्या अर्धशतकीय खेळीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर बेंगलोर ने 189 रन्सचा टप्पा गाठला आणि राजस्थान रॉयल्स ला 190 रन्स च टार्गेट दिले, राजस्थान कडून बॉलिग करताना ट्रेंट बोल्ट ने 4 ओव्हर्स मध्ये 41 रन्स खर्च करून 2 विकेट घेतल्या, त्यानंतर संदीप शर्मा ने 4 ओव्हर्स साधे तब्बल 49 रन्स खर्च करून 2 विकेट्स घेतल्या,रवीचंद्रन अश्विन ने 4 ओव्हर्स मध्ये 36 रन्स देऊन 1 विकेट घेतली,यजुर्वेद चाहल ने र ओव्हर्स मध्ये मात्र 28 रन्स देऊन 1 विकेट घेतली तर जेसन होल्डर ला 4 ओव्हर्स साधे 32 रन्स देऊन एकही विकेट घेता आली नाही.
रॉयल चॅलेंजर बंगलोर ने राजस्थान रॉयल्स ला दिले 190 रन्सचं टार्गेट
RCB VS RR रॉयल चॅलेंजर बेंगलोर ने दिलेल्या 190 रन्सच्या पाठलाग करताना राजस्थान रॉयल्स ची सुरवात पण रॉयल चॅलेंजर बेंगलोर सारखीच निराशाजनक झाली, राजस्थान रॉयल्स ची पहिल्याच ओव्हर च्या चौथ्या बॉलवर राजस्थान रॉयल्स चा स्कोर फक्त 1 असतांना पहिली विकेट पडली.जोस बटलर शून्यावर तंबूत परतला
RCB VS RR राजस्थान रॉयल्स कडून सालामीला खेळायला आलेले जोस बटलर आणि यशस्वी जयस्वाल यांच्यापैकीं जोस बटलर मोहम्मद सिराज च्या पहिल्या ओव्हर च्या चौथ्या बॉल वर क्लीन बोल्ड झाला, तो शून्यावर माघारी तंबूत परतला, तेव्हा राजस्थान रॉयल्स चा स्कोर 1 रन्स वर 1 आउट असा होता.
यशस्वी जयस्वाल ने फटकेबाजी चालू केली होती
RCB VS RR पहिल्या ओव्हर मध्ये जोस बटलर ची विकेट गेल्यानंतर राजस्थान रॉयल्स वर दबाव वाढेल असं वाटत असताना,पॉवर प्ले च्या ओव्हर्स साधे यशस्वी जयस्वाल ने फटकेबाजी करत 4 चौकारांच्या मदतीने 15 बॉल्स मध्ये 20 रन्सवर खेळत होता.जोस बटलर च्या जागी देवदत्त पदिक्कल खेळायला आला होता तो 10 बॉल्स मध्ये 2 चौकारांच्या मदतीने 11 रन्सवर खेळत होता.
यशस्वी जयस्वाल आणि देवदत्त पदिक्कल ने मोर्चा सांभाळला
RCB VS RR राजस्थान रॉयलकडून यशस्वी जयस्वाल आणि देवदत्त पदिक्कल ने मोर्चा सांभाळत 7.2 ओव्हर्स पर्यन्त 57 रन्स केले होते त्यात यशस्वी ने 24 बॉल्स मध्ये 4 चौकार आणि 2 षटकार च्या मदतीने 35 रन्स केले होते तर देवदत्त पदिक्कल ने 20 बॉल्स मध्ये 4 चौकार आणि 1 षटकार च्या मदतीने 31 रन्स केले होते.
RCB VS RR रॉयल चॅलेंजर बेंगलोर च दिवाळ काढताना यशस्वी आणि देवदत्त यांनी 60 च्या वर भागीदारी करत रॉयल चॅलेंजर बेंगलोर च्या बोलर्स चो अक्षरशः पिसे काढली ग्लेन मॅक्सवेल च्या 2 ओव्हर्स मध्ये दोघांनी 25 रन्स काढले तर हर्षल पटेल च्या 1 ओव्हर् मध्ये 10 रन्स चोपले, 9 व्या ओव्हर पर्यंत(ड्रिंक्स) राजस्थान रॉयल चा स्कोर 81 रन्सवर 1 विकेट असा होता.तर यशस्वी 42 आणि देवदत्त पदिक्कल 39 वर खेळत होते.
RCB VS RR पहिल्या ड्रिंक नंतर खेळायला लागल्यावर राजस्थान रॉयल्स कडून यशस्वी आणि देवदत्त पदिक्कल कडून धामाकेदार बॅटिंग चालूच होती, त्यांनी ड्रिंक्स नंतर च्या 2 ओव्हर्स मध्ये 10 रन्स 15 रन्स काढले होते 11 ओव्हर्स साधे राजस्थान रॉयल्स चे 98 रन्स वर 1 विकेट असा स्कोर होता.
RCB VS RR राजस्थान रॉयल्स चा स्कोर 100 च्या वरती गेलेला असताना इकडे देवदत्त पदिक्कल ने 34 बॉल्स मध्ये धडाकेबाज 52 रन्स केले, त्यात त्याने 7 चौकार आणि 1 षटकार ची मदत घेतली होती, त्याला डेव्हिड विले ने विराट कोहली कडे कॅच देऊन आऊत केले,तेव्हा राजस्थान रॉयल्स चा स्कोर 11.4 ओव्हर मध्ये 99 वर 2 विकेट असा होता.
RCB VS RR देवदत्त पदिक्कल च्या अर्धशतकीय पारीनंतर आता यशस्वी जयस्वाल पण आपलं अर्धशतक पूर्ण करेल असं वाटत असताना,त्याने 47 रन्स वर आपली विकेट गमावली, त्याने 37 बॉल्स मध्ये 5 चौकार आणि 2 षटकार च्या मदतीने 47 रन्स केले, त्याला हर्षल पटेल ने विराट कोहली कडे कॅच देऊन आउट केले.तो आउट झाला तेव्हा राजस्थान रॉयल्स चा स्कोर 13.4 ओव्हर्स मध्ये 108 रन्स वर 3 विकेट असा होता.
RCB VS RR 108 रन्स वर राजस्थान रॉयल्स चे 3 विकेट गेल्यानंतर जिकायला 38 बॉल्स मध्ये 82 रन्स ची गरज असताना संजू सॅमसन कडून अपेक्षा होत्या मात्र त्याने त्या अपेक्षा मोडीत काढल्या, तो सोळाव्या ओव्हर च्या दुसऱ्या बॉलवर, 15 बॉल्समध्ये 2 चौकार आणि 1 षटकार च्या मदतीने 22 रन्स करू शकला, त्याला हर्षल पटेल ने शहबाज अहमद कडे कॅच देजन आउट केले,तेव्हा राजस्थान रॉयल्स चा स्कोर 125 रन्स वर 4 आउट असा होता.
RCB VS RR डेव्हिड विले च्या बॉलिंग वर ध्रुव जुरेल ने फटकेबाजी करत 18 व्या ओव्हर च्या पहिल्या बॉल वर षटकार ठोकत आपले इरादे स्पष्ट केले,मात्र दुसरीकडून शिमरोन हेतमायर ने 18 व्या ओव्हर्स च्या पाचव्या बॉलवर आपली विकेट गमावली, तो 9 बॉल मध्ये 3 रन्स करून आउट झाला, त्याला सुयश प्रभुदेसाई ने रनआउट केले.
RCB VS RR राजस्थान रॉयल्स ला 12 बॉल्स मध्ये जिंकायला 32 रन्सची गरज असताना,ध्रुव जुरेल आणि रवीचंद्रन आश्विन खेळत होते,ध्रुव जुरेल 13 बॉल्स मध्ये 25 रन्स वर खेळत होता, तर रवीचंद्रन अश्विन 2 बॉल्स मध्ये 2 रन्स वर खेळत होता ,19 व्या ओव्हर च्या पाचव्या बॉलवर मोहम्मद सिराज ला ध्रुव जुरेल ने एक एक षटकार ठोकत राजस्थान रॉयल चा स्कोर 168 वर आणला.
RCB VS RR रॉयल चॅलेंजर बेंगलोर कडून हर्षल पटेल ने ओव्हर टाकायला सुरवात केली असता पहिल्या बॉलवर रवीचंद्रन अश्विन ने चौकार मारला, दुसऱ्या बॉल वर 2 रन्स काढले,तिसऱ्या बॉलवर परत चौकार मारत, राजस्थान रॉयल्स च्या आशा लल्लवीत केल्या,मात्र चौथ्या बॉल वर रवीचंद्रन अश्विन ने आपली विकेट गमावली, त्याला हर्षल पटेल ने सुयश प्रभुदेसाई कडे कॅच देऊन आउट केले,त्याने 2 चौकारांच्या मदतीने 6 बॉल्स मध्ये 12 रन्स केले,त्यांनतर आलेला अब्दुल बसिठ 1 रन काढून नॉट आउट राहिला आणि ध्रुव जुरेल ने केलेल्या प्रयत्नांना यश आले नाही,तो 16 बॉल्समध्ये 2 चौकार आणि 2 षटकार च्या मदतीने 34 रन्स करून नॉट आउट राहिला, त्यामुळे राजस्थान रॉयल्स 20 ओव्हर्स मध्ये 182 रन्सवर 8 विकेट्स करू शकली, आणि रॉयल चॅलेंजर बेंगलोर कडून 7 रन्सने हरली.
RCB VS RR रॉयल चॅलेंजर बेंगलोर कडून बॉलिंग करताना मोहम्मद सिराज ने 4 ओव्हर्स मध्ये 39 रन्स देऊन 1 विकेट घेतली,डेव्हिड विले ने 4 ओव्हर्स मध्ये 26 रन्स देऊन 1 विकेट घेतली,व्यषक विजय कुमार ने 2 ओव्हर्स मध्ये 24 रन्स देऊन एकही विकेट घेतली नाही,ग्लेन मॅक्सवेल ने सुद्धा 2 ओव्हर्स मध्ये 25 रन्स देऊन एकही विकेय घेतली नाही,हर्षल पटेल ने मात्र सर्वाधिक 4 ओव्हर्स मध्ये 32 रन्स देऊन 3 विकेट्स घेतल्या आणि वणींडू हसरंगा ने 4 ओव्हर्स मध्ये 32 रन्स देऊन एकही विकेट घेतली नाही.
RCB VS RR
IPL 2023 Points Table
IPL 2023 Points Table
शेठ हे पण वाचा:-






Post a Comment